बुधवार, ११ डिसेंबर, २०१३

कावळा


  कावळा काळा कि, पांढरा ?  यावर पैंज लागली. नेता म्हणे पांढरा अन शिक्षक म्हणे काळा.तथ्याच्या आधारावर शिक्षकाचे बरोबर होते.परंतु नेता तो कसला. मुरब्बी राजकारणी... गिरे तो भी टांग उपर....... बारा गावचे पाणी प्यालेला....त्याला ठाऊक असूनही हारकावळा मानायाला तयार नव्हता.केवळ

 शिक्षकाची मान कशी झुकवयाची हे ठरवून आलेला होता.  स्वत:चा खाक्या दाखवीत याचा निर्णय आपण लोकशाही पद्धतीने मतदान करून घेऊ अशी टूम   त्याने काढली.जमलेली मंडळीनी  हो हो केले.मतदान स्वाभाविक पणे नेत्याच्या बाजूने झाले. नेता जिंकला.... कावळा काळा असून पांढरा कावळा  हे लोकशाही पद्धतीने ठरविले.कावळा काळा म्हणणारा विद्याविभूषित  शिक्षक मात्र मूर्ख ठरला.भारतात असे आहे नेता सांगे तेच खरे ..... 

कावळे किती हुशार असतात. याची आपणास कल्पना नसेल.रस्ताच्या कडेला असलेल्या एका झाडाला फळे येऊ लागली कडक स्वरुपाची फळे  त्यांच्या टोकदार चोचीतून फुटत नव्हती तेव्हा कावले महाशयांनी युक्ती केली.फळ तग धरलेल्या शेंड्यावर कावळे चोची चे वार करू लागले फळ रस्त्यावर पडू लागली अन भरधाव वेगाने येणाऱ्या गाडयांच्या खाली फुटू लागली.तद्नंतर कावळे समुदाय त्यावर ताव मारू लागले होते. 

एकदा एक मरतुकडा उंदीर रस्त्यातून हळू हळू चालला होता.कावळ्यांच्या समुदायाचे लक्ष्य गेले सर्व त्यावर तुटून पडले.चोचीने घायाळ केले.काही वेळेतच उंदीर मामा शेवटची घटका मोजू लागले. रस्त्याच्या मधोमध निपचित पडले होते . कावळे त्यांच्या अंगावर बसून न्याहारी करू लागले एक कावळा त्यांच्या तोंडावर बसून न्याहारी करू लागला उंदीर मामा निपचित पडले होते ... पण प्राण अजूनही शिल्लक होता.मामानी मुख हळूच उघडले अन त्यांच्या तोंडावर बसलेल्या कावळ्याचे पाय करकचून आवळले. कावळा कावकाव करीत तडफडू लागला. पाय झिडकारू लागला .... चोच मारी .....पण उंदीर मामा त्याचे पाय काही सोडेनात. सर्वत्र कावळे काव काव करीत होते.गोंगाट झाला. रस्त्यांनी जाणारे येणारे कावळ्या विषयी सहानुभूती  प्रकट करू लागले.परंतु मामांनी देखील ठरविले असावे प्राण गेला तरी बेहत्तर पण याला मी सोडणार नाही.कितीतरी वेळ ते दृश्य मी पाहत होतो.अखेर मामांची प्राणज्योत मालविली. कावळ्या नी आपली सुटका करून घेतली.

                 आमच्या मित्राचा मुलगा तरुणपणी गेला. दु:ख झाले रोज पिठांचे गोळे खायला येणारा कावळा त्यांच्या खिडकीवर येउन बसला. काव काव नाही काही गलबला नाही तो खाण्यासाठी नव्हे तर मूक सांत्वनासाठी आलेला होता त्यांच्या डोळ्यातील  अश्रुनी कळले  अनेकांनी कोरड सांत्वन केल होत, त्यापेक्षा हे मुक सांत्वन  मनाला स्पर्ष करुन गेलं.

               कावळा म्हणे "मी काळा, पांढरा शुभ्र तो बगळा दिसतसे   वाहवा तयाची करीती, मजला ते धिक्कारिती लोक हे !"

या सर्वाच उट्ट कावळा काढतो ते त्याला पितरांच स्थान दिल जात तेव्हा द्शक्रीयेला  पहा, नेहेमी काव काव करुन सर्व कावळ्यांना जमा करणारा हाच कावळा, कुठे तरी झाडाच्या वरच्या फ़ांदीवर बसलेला असतो व एका डोळ्यानी बघत असतो.   कितीही विनवण्या केल्या तरी तो नाहीच बधत . कं बिचारे काव काव ओरडातात, काय काय अमिष दाखवत असतात पण जेव्हा त्याला वाटॆल तेव्हाच तो येतो.

 

परवा आमच्या नारळाच्या झाडाला एक पिलू अडकले होते.झाड उंचावर असल्यामुळे पिलू कुणाचे  कावळ्याचे कि, कोकिळेचे कळेनासे झाले. कावळ्यांची काव काव सुरु होती. परंतु एकही कावळा ती दोरी तोडण्यासाठी पुढे येत नव्हता. त्या पिला वाचविण्याचा प्रयत्न करीत नव्हता अजब वाटले.अखेर मीच अग्निशमन दलाला फोन केला. पिलू जिवंत आहे का? असा प्रतिप्रश्न त्यांनी केला. त्यावर तडफडत आहे हो!लवकरात लवकर या आणि वाचवा हो त्याला. मी त्यांना काकुळतीने विनंती केली. अगदी काही क्षणातच ते धावत आले त्याला वाचविले.हायसे वाटले.त्या खाली आणले तेव्हा कळले ते कोकिळेचे पिलू होते. मुक्या प्राण्याचा जीव वाचविल्याचा आनंदी भाव  माझ्या चेहऱ्यावर उमटू लागले.ते जर कोकिळेचे पिलू होते तर कावळे का बरं काव काव करीत होते.कोकिळा कावळ्यांच्या समुदायाला मूर्ख बनविण्यात पटाईत .कावळ्याच्या  मादीने घातलेली अंडीची विल्हेवाट लाऊन आपली अंडी कावळ्यांच्या घरट्यात उबविण्यासाठी ठेऊन  कोकिळा मागे वळून न पाहता  दुसऱ्या कामासाठी आगेकूच करते. आपलीच अंडी समजून उबविणाऱ्या कावले दांपत्याला याची कल्पना पिले झाली तरी येत नाही कारण

कोकिळेची पिलं काही दिवसांतच उडून जातात.(कावळ्यांची संख्या दिवसेंदिवस का कमी होते आहे याचा मागोवा प्राणी मित्रांनी घेतला तेव्हा हे दिसून आले.कावळ्याचे कर्कश आवाज यांच्या ऐवजी

कोकिळेचे सुमधुर स्वर कानावर येऊ लागले आहेत.

घरी पाहुणा येण्याची आगाऊ सूचना देणारा कावळे समुदाय दिवसेंदिवस कमी होऊ लागला आहे.डांस,

उंदीर, घुशी,यांच्या  त्रासाखातर माणसांनी केलेले कीटक नाशक प्रयोग कावळ्यांच्या अंगलटीस येऊ लागले कारण मरून पडलेल्या उंदीर घुशी वर ताव मारताना ते मरण ओढवितात.

                                    माणूस मेल्यानंतर पिंडाला कावळा शिवला पाहिजे अन्यथा आत्मा.........संतुष्ट पावत नाही. मृत्युनंतर हे जे कोणी "आत्मा" महाशय आहेत त्यांना स्वर्गाचा रस्ता दाखविण्यासाठी "कावळा" मदत करतो, त्यासाठी चांगले अन्न देऊन त्याचे पोट भरणे हे क्रमप्राप्त असते. विशेष म्हणजे कावळ्याचा नैसर्गिक मृत्यू कोणी पाहिआ नसेलच. कावा हिमालयात विशिष्ट ठिकाणी आपला देह ठेवतात 

दशक्रीयेला- श्राध्दांसाठी  मानाचं स्थान असलेल्या या कावळे जाती भविष्यात दिसतील का  

 



९ ९ ६ ९ ० १ ७ १ ७ ९

email  shailabheke@yahoo.com